पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस heavy rain in rajasthan after punjab

पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस

पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस
www.24taas.com, झी मीडिया, जयपूर

पंजाबनंतर आता वायव्य राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे जनजीवनमान विस्कळित झाले आहे. छुरूमध्ये 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या साडेआठ तासांपासून ते आतापर्यंत मुसळधार पावसाने वायव्य राजस्थानला झोडपले आहे.

विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पिलानीमध्ये 42.1, गंगानगर 23.2, बिकानेर 21.2, जोधपूर 2.4, अजमेर 1.2 व जयपूरमध्ये 1.0 मि.मि. एवढी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला असून, ठिकठिकाणी वाहने अडकून पडली आहे. तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यातील विविध भागात वीज गायब झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 13, 2014, 19:26


comments powered by Disqus