Last Updated: Thursday, January 10, 2013, 09:46
www.24taas.com, मथुरा जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या दोन जवानांपैकी लान्स नायक हेमराज सिंह यांच्या पार्थीवावर बुधवारी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. हेमराज यांच्या केवळ पाच वर्षांच्या मुलानं त्यांना अग्नी दिला.
मुळचे मथुरेचे लान्स नायक हेमराज सिंह हरियाणाजवळच्या एका छोट्या गावातून सैन्यात भरती झाले होते. बुधवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास हेमराज यांचं पार्थिव शरीर त्यांच्या गावी पोहचलं. यावेळी आजूबाजूच्या गावांतीलही हजारो लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. हेमराज यांच्या पार्थिवाला त्यांचा पाच वर्षांचा मुलगा प्रिन्स याच्या हातानं मुखाग्नि दिला गेला. यावेळी सेना, पोलीस आणि प्रशासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
First Published: Thursday, January 10, 2013, 09:46