पुन्हा महाभारत, पत्नीलाच लावले जुगारात, Husband put his wife in gambling

पुन्हा महाभारत, पत्नीलाच लावले जुगारात

पुन्हा महाभारत, पत्नीलाच लावले जुगारात
www.24taas.com, नवी दिल्ली

आपल्या देशात कलियुगात काय होईल, हे सांगता येत नाही. पुन्हा महाभारताची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. इतिहासातील काळा दिवस पुन्हा उजाडलाय. जुगार खेळण्यासाठी चक्क पत्नीलाच पणाला लावले. या दुर्दैवी प्रकाराबाबत उद्वेग व्यक्त होत आहे.

पांडवांनी कौरवांसोबत खेळताना सर्व संपत्ती हरल्यानंतर द्रौपदीला पणाला लावले होते. त्यानंतर द्रौपदी वस्त्रहरणाचे देशाच्या इतिहासातील काळे पान घडले. हेच काळे पान पुन्हा अधोरेखीत झाल्याने चिड व्यक्त होत आहे.

आपण कितीही नवयुगाच्या गोष्टी करीत असलो तरी काहीही बदल झालेला नाही, हेच या दुर्दैवी घटनेनंतर म्हणावे लागते. उत्तर भारतातील गाझियाबाद जिल्ह्यातील नेहरूनगर येथे जुगारात हरलेल्या पतीने आपल्या पत्नीला पणाला लावून माणुसकीला धक्का पोहोचवलाय.

दहा दिवसांपूर्वी पतीने मला जुगारात लावले होते. तो जुगारात हरल्याने इतर जुगारी घरी आलेत. त्यावेळी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी कशीतरी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर पती आणि इतर जुगारींविरुद्ध तक्रार दाखल केल्याची माहिती तिने पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी पत्नीला जुगारात लावल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी पतीने तिला नणंदेच्या नवऱ्यासोबत संबंध ठेवण्यास सांगितले होते. परंतु, नकार दिल्यावर तिला बेदम मारहाण करण्यात आली, असेही या पिढीत महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

First Published: Tuesday, December 4, 2012, 15:57


comments powered by Disqus