दिल्लीचा लाल किल्ला उडवण्यांची अतिरेक्यांची धमकी IB warns of LeT attack in Delhi

दिल्लीचा लाल किल्ला उडवण्यांची अतिरेक्यांची धमकी

दिल्लीचा लाल किल्ला उडवण्यांची अतिरेक्यांची धमकी
www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली

मुंबईत २६/११ चा हल्ला करणारा मास्टरमांईड हाफिज सईदने एतिहासिक लालकिल्ला उडवण्यांची धमकी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी दिल्लीत हाय अलर्टचा इशारा दिला आहे.

सईदने एका मेळाव्यात बोलतांना लाल किल्ल्यांवर हल्ला करण्यांचा इरादा स्पष्ट केला. २००० मध्ये दिल्लीत हल्ला केला त्यांचप्रमाणे आता तसा पुन्हा करण्याची धमकी दिली आहे.

जमात उदचा प्रमुख हाफिज सईद याने ट्विटरवर ईदच्या शुभेच्छापत्रकांबरोबर भारतांच्या विरोधात काही सूचनादेखील दिल्या आहेत. पाकिस्तानमधील लाहोरच्या गदाफी स्टेडियममध्ये शुक्रवारी ईद-अल-फितरच्या प्रार्थना सभेला हाफीज सईद हा उपस्थित राहणार होता. याविषयी आयबीने दिल्ली पोलिसांना पत्र दिलंय त्यामुळे दिल्ली पोलिसांनी हाय अलर्ट केला आहे.

लश्कर-ए-तयबाचा संस्थापक हाफिज सईद याने कराचीमध्ये आयोजित केलेल्या एका मेळाव्यात असा म्हणाला की, “धर्मयुध्द हे फक्त दुसऱ्या देशांपुर्तेच मर्यादित न राहता भारतात पण झाले पाहिजेत. आता जी परिस्थिती आहे त्यातच २००० मध्ये झालेल्या हल्ल्यासारखा हल्ला करणे गरजेचे आहे आणि हा हमला कोणीही थांबवू शकत नाही”



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 9, 2013, 15:06


comments powered by Disqus