पाकमध्ये बॉम्बस्फोटात ११ ठार, Pakistan: Bomb Blast Kills 11 at Soccer Field

पाकमध्ये बॉम्बस्फोट, ११ ठार

पाकमध्ये बॉम्बस्फोट, ११ ठार
www.24taas.com, झी मीडिया, कराची

पाकिस्तानमध्ये पुन्हा बॉम्बहल्ल्याने हादरले. कराची शहरातील लयारी भागात मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटात ११ मुले ठार तर २४ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कराची येथील स्टेडियमवर बारा ते चौदा वयोगटातील दोन संघांमध्ये फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लयारी परिसरात एका दुचाकीवर स्फोटके ठेवण्यात आली होती. सामना संपल्यानंतर प्रेक्षक स्टेडियममधून बाहेर पडत असताना हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात ११ मुले ठार झाल्याचे वृत्त आहे.

फुटबॉल सामना पाहण्यासाठी लहान मुलांनी गर्दी केली होती. सामना संपल्यानंतर हा स्फोट घडवून आणल्यामुळे मृतांमध्ये लहान मुलांचा जास्त समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फुटबॉल सामन्याचे प्रमुख पाहुणे सिंध प्रांताचे सदस्य जावेद नागोरी हेही स्फोटात जखमी झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 7, 2013, 14:09


comments powered by Disqus