दहशतवाद्यांनी केले खळबळजनक खुलासे, jammu and kashmir lashkar militants plan to attack

दहशतवाद्यांनी केले खळबळजनक खुलासे

दहशतवाद्यांनी केले खळबळजनक खुलासे

www.24taas.com, झी मीडिया, श्रीनगर
जम्मू काश्मीरच्या विमानतळांसह काही महत्त्वाच्या ठिकाणं दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी बऱ्याच स्थानांवर दहशतवादी कारवाया करण्याची योजना असल्याचा खुलासा दहशतवाद्यांनी केला आहे.

गेल्या दोन आठवड्यात दहशतवाद प्रभावीत बडगाम भागात पकडण्यात आलेल्या पाच दहशतवाद्यांनी हा खुलासा केला आहे. हे पाच दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असून जम्मू काश्मीरातील दहशतवादी घटनांमध्ये त्याचा हात असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
मंगळवारी या दहशतवाद्यांची चौकशी झाली त्यावेळी हा खुलासा केला. काही मोठ्या इमारती आणि काही राजकारणी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. दहशतवादी एखाद्या मोठ्या नेत्यावर हल्ला करून दहशत निर्माण करण्याची संधी पाहत असल्याचेही या दहशतवाद्यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेले दहशतवादी गेल्या महिन्यात चडूरा येथील एसएचओच्या हत्येत सामील होते.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 22, 2014, 17:23


comments powered by Disqus