Last Updated: Friday, February 21, 2014, 12:49
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीउद्योगपती मुकेश अंबांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना खिशात घालून फिरतात, असा घणाघाती आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
दोघांच्या सभांचा आणि हेलिकॉप्टर वाहतुकीचा खर्चही अंबानीच उचलत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केलाय. त्यामुळं राहुल गांधी मंत्र्यांमार्फत मुकेश अंबानींच्या सोयीचे निर्णय घेतात.
तर मोदीही अंबांनींच्याच पाठिशी असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केलाय. नरेंद्र मोदींनी गॅसदराबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत केजरीवालांनी मोदींना पत्र लिहिलंय.
अशाच आशयाचं पत्र ते राहुल गांधींना लिहिणार असून त्यांनीही भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केजरीवालांनी केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 21, 2014, 12:49