`मुकेश अंबानी `मोदी-राहुल`ना खिशात घालून फिरतात`

Last Updated: Friday, February 21, 2014, 12:49

उद्योगपती मुकेश अंबांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना खिशात घालून फिरतात, असा घणाघाती आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

गॅस दरवाढ १ एप्रिलपासून दामदुप्पट

Last Updated: Saturday, February 15, 2014, 09:08

नैसर्गिक गॅसची दरवाढ दामदुप्पट होणार आहे. तसे संकेत पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी दिले आहेत. गॅस उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१४ पासून दरवाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही दरवाढ सध्याच्या दराच्या दुप्पट आहे.

दहाव्या सिलिंडरच्या किंमतीत २२० रुपयांची वाढ

Last Updated: Thursday, January 2, 2014, 07:36

विना अनुदानित गॅस सिलेंडर तब्बल २२० रुपयांनी महागलंय. त्यामुळं अनुदानित नऊ सिलिंडरनंतरचं दहावं विनाअनुदानित सिलिंडर तब्बल १२६४ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळं अतिरिक्त सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.

शिळ्या अन्नापासून बायोगॅस निर्मिती

Last Updated: Sunday, October 21, 2012, 11:57

एलपीजी गॅसच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती आणि सबसिडी गॅसच्या संख्येवर आणलेली मर्यादा लक्षात घेऊन खानावळ चालवणाऱ्या जळगावच्या अनिल भोळेंनी यावर रामबाण उपाय शोधून काढलाय.

दोनशे मुलांचा स्वयंपाक दहा मिनिटांत!

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 19:08

नाशिक शहरातील अनाथ मुलींसाठी कार्य करणाऱ्या आधाराश्रम या संस्थेनं सोलर एनर्जीचा वापर करत इंधनबचतीचा आदर्श घालून दिला आहे. तब्बल दोनशे अनाथ मुलींचा स्वयंपाक अवघ्या दहा मिनिटात होतोय. याच स्वयंपाकासाठी महिन्याकाठी तीस सिलेंडरचा खर्च पँराबोलिक सोलर सिस्टममुळे वाचत आहे.

गॅस दरवढीवर येरवड्याची मात, कैद्यांना बायो-गॅसची साथ

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 22:47

नुकत्याच झालेल्या गॅस दरवाढीमुळे पुण्यातल्या येरवडा जेलचं वार्षिक बजेट कोलमडणार आहे. या पार्श्वभूमीवर जेलमधल्या साडेतीन हजार कैद्यांच्या स्वयंपाकासाठी जैविक इंधन वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यामुळे इंधनावरचा ७० टक्के संभाव्य खर्च कमी होईल.

गॅसदरवाढीवर थॉमस यांची स्लॅब सिस्टमची सूचना

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 12:58

सबसिडीच्या दरात सहा सिलिंडर देण्याच्या निर्णयाला आता काँग्रेसमधूनच विरोध होऊ लागलाय. केंद्रीय अन्न मंत्री के. व्ही. थॉमस यांनी सिलिंडरच्या संख्येबाबत पंतप्रधानांना पत्र लिहलंय. यात गॅसच्या भाववाढीसाठी ‘स्लॅब सिस्टम’ वापरण्याची कल्पना थॉमस यांनी सुचवली आहे.

कोल्हापूरकर 'गॅस'वर

Last Updated: Friday, March 30, 2012, 21:00

कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या संपामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळं नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.