पाचच्या बदल्यात पाकचे ५० मारा – शिवसेना, Kill 50 in Pakistan to avenge 5 Indian soldiers` deaths: Shiv Sena

पाचच्या बदल्यात पाकचे ५० मारा – शिवसेना

पाचच्या बदल्यात पाकचे ५० मारा – शिवसेना
www.24tass.com , झी मीडिया, नवी दिल्ली

पाकिस्तानची नांगी मोडण्यासाठी त्यांचे ५० जवान ठार केले पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. पाकिस्तानची मस्ती काही उतरलेली नाही. पाकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यांच्या हल्ल्यात ५ भारतीय जवानांना शहीत व्हावे लागले. यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

भारतीय हद्दीत घुसून पाकिस्तानी सैन्याने अंधाधुंद गोळीबार केला. आमचे पाच शहीद झालेत. याबदल्यात त्यांचे ५० मारा, अशी जळजळीत प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

ते पुढे म्हणालेत, लष्कराचे जवान जोपर्यंत पाकिस्तानमध्ये घुसून ५० पाकि सैनिक ठार करत नाही. तोपर्यंत या पाच जवानांचा बदला पूर्ण होणार नाही. या हल्ल्यातून आपल्याला धडा घेण्याची गरज आहे.

दरम्यान, पाकिस्तान सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सतत करण्यात येत असून, सोमवारी रात्री भारतीय हद्दीत प्रवेश करून पाक सैन्याने गोळीबार केला होता. तर दुसरीकडे आमचेच जवान शहीद झाल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. हा भारताने हल्ला घडवून आणल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 6, 2013, 14:04


comments powered by Disqus