Last Updated: Sunday, June 22, 2014, 16:21
www.24taas.com, वृत्तसंस्था, गांधीनगरगुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल लवकरच 100 कोटींच्या विमानातून प्रवास करणार आहेत. गुजरात सरकार १०० कोटी खर्च करुन पटेलसाठी एअरक्राफ्ट खरेदी करणार आहेत.
खरं तर गुजरातच्या मुख्यमंत्र्याच्या १५ वर्षांपूर्वीचा नऊ सीटर एअरक्राफ्ट या वर्षी रिटायर्ड होत आहे. डिसेंबर २०१४मध्ये या एअरक्राफ्टच्या वापरण्याचं वय पूर्ण होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या असलेलं एअरक्राफ्ट मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी १९.१२ कोटी रुपयाला एका एजंटकडून विकत घेतलं होतं. त्यावेळी कॅगनं या विमान खरेदीवर टीकाही केली होती. या विमानाचं आयुष्य यावर्षी संपतंय. त्यात सारख्या-सारख्या तांत्रिक अडचणी येत असल्यानं मुख्यमंत्री आणि काही दुसऱ्या व्हीव्हीआयपींना खूप वेळा प्रायव्हेट विमानातून प्रवासही करावा लागला आहे.
त्यामुळं आता नवं विमान गुजरात सरकारच्या दिमतीला येतंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 22, 2014, 16:21