गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसाठी १०० कोटींचं नवं विमान

Last Updated: Sunday, June 22, 2014, 16:21

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल लवकरच 100 कोटींच्या विमानातून प्रवास करणार आहेत. गुजरात सरकार १०० कोटी खर्च करुन पटेलसाठी एअरक्राफ्ट खरेदी करणार आहेत.

सोमय्या माफी मागा, अन्यथा १०० कोटींचा दावा - भुजबळ

Last Updated: Thursday, March 13, 2014, 19:13

भ्रष्टाचारांच्या आरोपांप्रकरणी बिनशर्थ माफी मागा, अन्यथा १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिलाय. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भुजबळ यांनी रितसर नोटीस बजावली आहे.

अजित पवारांचा २२ हजार कोटींचा घोटाळा - दमानिया

Last Updated: Thursday, February 20, 2014, 16:47

राज्याच्या ऊर्जा खात्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी केलाय. तर राष्ट्रवादीने आपवरही आरोप केलाय. बिल्डर आणि आपचं साठलोटं असल्याचं म्हटलंय.

जालन्याच्या श्वेताला 'गुगल'ची एक कोटीच्या नोकरीची ऑफर

Last Updated: Thursday, December 19, 2013, 07:43

जालन्याच्या युवतीची आयटी क्षेत्रात उतुंग झेप घेतली. तिला चक्क दहा नोकरीच्या ऑफस आल्यात. मात्र, तिने गुगलची ऑफर स्वीकारली. आता तिला वर्षाकाठी गुगल चक्क एक कोटी रूपयांचे वार्षिक वेतन देणार आहे.

महेंद्रसिंग धोनी जाहिरात विश्वाचा राजा, केला २५ कोटींचा करार

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 23:18

महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा जाहिरात विश्वाचा राजा बनला आहे. ऑस्ट्रेलियन कंपनी स्पार्टन स्पोर्टस आणि अॅमिटी युनिव्हर्सिटीबरोबर तो २५ कोटींचा करार करणार आहे. या करारानंतर धोनीच्या बॅटची किंमत असणार आहे ती २५ कोटी.

बुंदेलखंडमध्ये सापडली ४००० कोटींची संपत्ती!

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 12:10

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये साधूच्या स्वप्नातील सोनं पुरातत्त्व विभागाला सापडो अथवा न सापडो, मात्र बुंदेलखंडमधील ४००० कोटींच्या खजिन्याचा शोध भूगर्भ शास्त्रज्ञांनी लावला आहे.

अबब...९० कोटींना बंटी-बबलीचा पुन्हा गंडा

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 14:36

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा शहरात शेकडो गुंतवणूकदारांना बंटी-बबलीने फसविले आहे. `मनी मंत्र` नावाची एक शेअर गुंतवणूक करणारी कंपनी स्थापून या कंपनीने सुमारे ९० कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.

गावात शेण उचलणारा झाला ११९९ कोटींचा मालक

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 16:31

जगात असे लोक आहेत की स्वप्नातही ऐश आरामाचे जीवनाचे स्वप्न पाहात नाहीत. मात्र, कधी कधी असा चमत्कार घडतो की, त्यावर विश्वास ठेवणेही शक्य होत नाही. अशीच एक अजब घटना घडली आहे. सर्वधासाधण जीवनजगणाऱ्याला पैशाची लॉटरीच लागलीय. तो एका रात्रीत कुबेर झालाय. ही वास्तवातील घटना आहे. गावात शेण उचलणारा ठरला आहे, ११९९ करोड़ रुपयांचा मालक.

कसाबचा सुरक्षा खर्च ३१.४० कोटींचा, केंद्राचं उत्तर

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 16:05

२६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबवर सुरक्षेसाठी ३१.४० कोटी रूपये खर्च आल्याची माहिती संसदेत देण्यात आली. ३१.४० कोटी रूपये खर्च झाल्याचे एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने हे स्पष्ट केलंय.

भारतीय विद्यार्थ्यांना १.२२ कोटींची 'गुगल' लॉटरी

Last Updated: Monday, December 10, 2012, 12:08

बिट्स पिलानी या शिक्षणसंस्थेत कम्प्युटर सायन्स इंजिनीयरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तीन भारतीय विद्यार्थ्यांना गुगलनं प्रत्येकी १.२२ कोटी रुपये पगाराचं पॅकेज ऑफर केलंय.

१८ पॅनकार्ड, ४८ फोन, ७५ डेबिट कार्ड आणि १३१ चेकबुक

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 19:26

सुमारे हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोपी आणि स्टॉक गुरू कंपनीचा मालक उल्हास खरेच्या विविध घरांवर छापे मारून महाराष्ट्र पोलिसांनी सुमारे २० कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

बबली-बंटीने लाखोंना ११०० कोटींना गंडविले

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 11:54

सहा महिन्यांत पैसे दुप्पट देण्याचे आमिष दाखवून देशभरातील तब्बल दोन लाख लोकांना गंडा घालणार्याप नागपुरातील एका जोडप्याला रत्नागिरीत पोलिसांनी अटक केली आहे. बबली-बंटीच्या अटकेनंतर तब्बल ११०० कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या बबली-बंटींने आणखी किती जणांना गंडविले त्याची माहिती अजून पोलिसांनी उघड केलेली नाही.

‘स्टॉक गुरू’नं घातला तब्बल ५०० कोटींचा गंडा

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 18:42

५०० कोटींना फसवणाऱ्या एका जोडप्याला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. या जोडप्यानं एक बोगस कंपनी स्थापन करुन, पैसे दुप्पट करुन देण्याचं अमिष दाखवून साधारण दोन लाख लोकांना फसवलंय. हे जोडपं मूळचं नागपूरचं असल्याचं समजतंय.

अभिनेता सैफ अली खान '७५० करोडचा धनी'

Last Updated: Thursday, November 8, 2012, 12:50

नुकतेच करीना कपूरशी मोठ्या धूमधडाक्यात लग्न करणारा अभिनेता सैफ अली खान यांची संपत्ती तब्बल ७५० कोटीच्या घरात आहे. सैफ अली खानची पतोडीमध्ये महल आणि पूर्वंजांची पूर्ण संपत्ती ७५० कोटीची आहे.

पेणमध्ये गणेशमूर्तीतून २० कोटींची उलाढाल

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 22:25

गणपती मूर्ती तयार करण्यासाठी पेण प्रसिद्ध आहे. येथील गणेश मूर्ती देश-विदेशात नेल्या जातात. या ठिकाणी तब्बल ४५० कार्यशाळांमधून ११ लाखांहून अधिक गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना झाल्या आहेत. यातून यावर्षी २० कोटीं रूपयांची उलाढाल झाली आहे.

सुपरफास्ट टायगर... पाच दिवसांत १०० कोटी!

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:23

१५ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या सिनेमानं केवळ पाच दिवसात ‘१०० कोटी क्लब’मध्ये स्थान मिळवलंय.

मुंबै बँकेत ४०० कोटींचा कर्ज घोटाळा

Last Updated: Friday, August 17, 2012, 17:46

मुंबै बँकेत सुमारे 400 कोटींचा कर्ज घोटाळा समोर आलाय. सर्वसामान्य लोकांनी कोणतेही कर्ज न घेताही त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याचं दाखवण्यात आलंय.

अबब.... पद्मनाभाचा खजिना १० लाख कोटींचा!

Last Updated: Friday, July 6, 2012, 16:09

केरळच्या ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिरात सापडलेला खजिना दहा लाख कोटींचा असल्याची शक्यता सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या टीमने व्यक्त केली आहे. ही टीम येत्या ८ ऑगस्टला आपला अहवाल कोर्टासमोर सादर करणार आहे.

शनिमहाराजांना दोन कोटींचा सोन्याचा मुखवटा

Last Updated: Thursday, June 7, 2012, 09:52

शिर्डीच्या साईबाबांप्रमाणेच आता शनि शिंगणापूर येथील जागृत आणि स्वयंभू मूर्ति असलेल्या शनि देवाला प्रथमच किमती वस्तूचं दान करण्यात आलं आहे. साडे चार किलो वजनाचा सोन्याचा मुखवटा एका शनि भक्ताने शनिदेवाला अर्पण केला आहे.

भारताकडून म्यानमारला ५० कोटी डॉलरचं कर्ज

Last Updated: Monday, May 28, 2012, 18:36

भारतानं द्विपक्षीय करारावर सह्या करत म्यानमारला मदतीचा हात पुढे केलाय. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग म्यानमार दौऱ्यावर आहेत.

युवीला पंजाबकडून एक कोटींचे बक्षिस

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 15:58

अमेरिकेतून कँसरवर उपचार घेऊन परतलेला भारताचा युवराज सिंगला पंजाब सरकारने एक कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

१०९ कोटींचे धनी निर्मलबाबा अटकेत

Last Updated: Saturday, April 14, 2012, 15:02

भक्तांच्या सर्व समस्यांना क्षणात सोडवण्याचा दावा करणारे निर्मलबाबा चांगलेच अडचणीत सापडलेत.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र काढून सोशल नेटवर्किंग साइटवरुन प्रसिद्द केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

केंद्राचे 10.67 हजार कोटींचे नुकसान

Last Updated: Thursday, March 22, 2012, 15:51

कॅगच्या अहवालात देशातला सर्वात मोठा घोटाळा उघड झाला आहे. कोळसा खाणींचा लिलाव न केल्यानं सरकारचे १० लाख ६७ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ऑर्नेस्टोनेंच पत्नीला गिफ्ट, ७४० कोटींचे जहाज

Last Updated: Saturday, March 10, 2012, 16:41

माजी ब्रिटन सुंदरी क्रिस्टी रोपरला तब्बल ७४० कोटी रुपये किमतीची ‘वावा- टू’ ही महागडी यॉट (जहाज) भेट देण्यात आली आहे. ही भेट दिली आहे, खुद पतीराज ऑर्नेस्टोने यांनी. ऑर्नेस्टोने हे लंडनमधील अब्जाधीश आहेत. त्यांचा ब्रिटनमध्ये श्रीमंतीत ८१ वा क्रमांक लागतो.

संपाने केले १० हजार कोटींचे नुकसान

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 09:15

अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला. या संपामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. तर संपादरम्यान, मुंबईतील सर्व राष्ट्रीय बँका जवळपास बंद होत्या. तर काही ठिकाणी दुपारपासून एटीएम मधील पैसे संपले होते. संपामुळे चेक क्लिअरिंगची यंत्रणा बंद असल्याने १0 कोटीहून अधिकचे व्यवहार ठप्प झाले होते.

पेण अर्बन बँकेचे लायसेन्स रद्द

Last Updated: Saturday, February 11, 2012, 21:25

पेण अर्बन बँक बंद पडून दीड वर्ष पूर्ण होत असताना रिझर्व्ह बँके कडून बँक दिवाळखोरीत का काढण्यात येऊ नये, अशी विचारणा प्रशासनाकडे केली होती. मात्र, आता ७५२ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँकेचा परवानाच ( लायसेन्स) रद्द केला आहे.