पाकचा कुटील डाव, नियंत्रण रेषेवर भू-सुरूंग Mine bombs on LOC by Pak

पाकचा कुटील डाव, नियंत्रण रेषेवर भू-सुरूंग

पाकचा कुटील डाव, नियंत्रण रेषेवर भू-सुरूंग
www.24taas.com, श्रीनगर

पाकिस्तानचा खोटारडेपणाचा आणखी एक बुरखा भारतीय लष्करानं फाडलाय. जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाक लष्करान भू सुरूंग पेरल्याचे पक्के पुरावे भारताच्या लष्करानं सादर केले आहेत.

नियंत्रण रेषेवर भू सुरूंग पेरल्याचे छाय़ाचित्र जारी केले आहेत. त्यामुळं पाकचे काळे कृत्य पुन्हा एकदा जगासमोर आलंय. हे भू सुरूंग नियंत्रण रेषेवर पेरण्यात आले आहेत. नियंत्रण रेषेजवळ भारताचे लष्कर जवान गस्त घालत असतात. त्यांनाच लक्ष्य करण्यासाठी हा पाक लष्काराचा कुटील डाव असल्याचं आता समोर येऊ लागलंय.

दरम्यान, आता पाकिस्तानवर कारवाई करायची वेळ आल्याचं भाजपने म्हटलं आहे. पाकिस्तानला जी भाषा कळते, त्यातच त्याच्याशी संवाद साधला पाहिजे, असं मत भाजपनं मांडलंय. पाकिस्तानला ठोश्याचा जवाब ठोश्यानं देण्याची वेळ आल्याची संपूर्ण देशाची भावना असल्याचं प्रवक्ता मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलंय.

First Published: Wednesday, January 16, 2013, 15:27


comments powered by Disqus