जवान शहीद होत असताना, पाकशी क्रिकेट सामने कशासाठी? - राज, Raj Thackeray on ind-Pak cricket match

जवान शहीद होत असताना, पाकशी क्रिकेट सामने कशासाठी? - राज

जवान शहीद होत असताना, पाकशी क्रिकेट सामने कशासाठी? - राज
www.24taas.com, मुंबई

`केंद्रातील सरकार आणि भाजपचा चर्चेचा खेळ सुरू आहे. समझोता एक्सप्रेस कोणी सुरू केली?` असा खडा सवाल करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान प्रश्नावर जोरदार टीका केली. `सीमेवर पाकचा धिंगाणा चालला असताना क्रिकेट सामने आणि अमन की आशा हे कार्यक्रम कशासाठी? असाही सवाल राज ठाकरेंनी केला.`

`जे जवान शहीद होत आहेत, त्यांच्यासाठी भविष्यात काय सरकार करते, सीमेवरील जवानांचा खेळ चाललाय. दोन दिवस सहानभुती दाखवायची, हेच सरकारचे धोरण आहे.` यापुढे काही घडले तर पाकिस्तानला उत्तर देऊ असे सांगणारे सिंग आधी घडलंय त्याकडे बघा, असं म्हणतं राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच लष्करप्रमुख विक्रम सिंग यांच्यावर राज ठाकरे यांनी तोंडसुख घेतले आहे.

हॉकी क्रिकेट सुरू रहाते आणि जवानांचा बळी जातो, सरकार का ठोस भूमिका घेत नाही? रालोआ सरकारच्या काळात सुरू केलेल्या समझोता एक्स्प्रेस आणि बसगाड्यांवरही त्यांनी टीका केली. कोणी या गाड्या सुरू करायला सांगितल्या होत्या?

First Published: Wednesday, January 16, 2013, 10:39


comments powered by Disqus