मोदींची लोकप्रियता वाढत आहे- ओमर अब्दुल्ला, Modi`s popularity can`t deny- omar abdullah

मोदींची लोकप्रियता वाढत आहे- ओमर अब्दुल्ला

मोदींची लोकप्रियता वाढत आहे- ओमर अब्दुल्ला
www.24taas.com, झी मीडिया, श्रीनगर

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दूल्ला यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. मात्र नरेंद्र मोदींची लोकप्रियता नाकारता येणार नाही, असं ओमर अब्दुल्लांना कबुल करावं लागलं आहे. नरेंद्र मोदींची देशात लाट नसून केवळ चर्चा असल्याची टीका त्यांनी केलीय. ओमर अब्दूल्लांनी मोदींवर टीका नेमकी का केली असा प्रश्न उपस्थित होतोय.

नरेंद्र मोदी यांची देशात चर्चा आहे, पण लाट नाही असा दावा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. अनेक लोक मोदींच्या लोकप्रियतेची लाट असल्याचं सांगतात. मात्र यात काही तथ्य नाही. मात्र भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोदींच्या बाबतीत उत्साह वाढला आहे. याबाबतीत काँग्रेसने सावध राहायला हवं. असा इशारा अब्दुल्ला यांनी दिला.

“मोदींच्या लोकप्रियतेचा परिणाम आगामी निवडणुकांत किती होईल हे निकालानंतरच कळेल. पण राजकारणात कोणत्याही नेत्याला गृहित धरता कामा नये. मोदींच्या बाबतीतही हे लागू आहे,” असेही ते म्हणाले.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, November 4, 2013, 18:57


comments powered by Disqus