Last Updated: Monday, January 21, 2013, 19:59
www.24taas.com, नवी दिल्लीउत्तर भारत थंडीने गारठलाय. हिमालय पर्वताच्या डोंगररांगांवर जोरदार बर्फवृष्टी सुरु झालीय. सियाचीन, लेह लडाखमध्ये तापमान -14 डिग्रीपेक्षा काली घसरलं आहे. तर श्रीनगरमध्ये 0 ते -4 डिग्रीपर्यंत पारा खाली आलाय.
डोंगररांगांवरच्या बर्फामुळे मैदानी भागात थंडीने काहूर माजलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीसह अनेक मैदानी भागात येत्या 48 तासात तापमान 2डिग्री पर्यंत खाली घसरु शकतं. दरम्यान, जोरदार बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी रस्ते जाम झालेत.
कुल्लू मनाली- चंदीगड हायवेबरोबरच 185 हून जास्त रस्ते बंद आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक रस्त्यात अडकले आहेत.
First Published: Monday, January 21, 2013, 19:58