विजय दर्डांची खासदारकी, जाहिरातींची दिवाळी, MP Vijay Darda sought on the letterhead of Diwali advertisement

विजय दर्डांची खासदारकी, जाहिरातींची दिवाळी

विजय दर्डांची खासदारकी, जाहिरातींची दिवाळी
www.24taas.com,नवी दिल्ली

खासदार विजय दर्डांसंदर्भात अतिशय खळबळजक बातमी. `झी २४तास`चा सगळ्यात मोठा खुलासा, विजय दर्डांसंदर्भातला. समाजसेवेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी खासदारकीच्या लेटरहेडचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दर्डा यांनी केला आहे. विजय दर्डांना त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या बिझनेसची जास्तच काळजी आहे, हेच या घटनेतून दिसून आलंय.

संसदेत समाजसेवेतचं व्रत घेत लोकप्रतिनिधी असलेल्या विजय दर्डांचे प्रत्यक्षात आर्थिक धंदे कसे सुरू आहेत, त्याची पोलखोल करणारी ही जबरदस्त बातमी. विजय दर्डा यांनी त्यांच्या ऑफिशिअल लेटरहेडवर जाहिरातींची मागणी केलीय.

`झी २४तास`च्या हाती त्यासंदर्भातलं पत्रं लागलंय. त्या पत्रामध्ये दर्डा यांनी लेटरहेडवर दिवाळीसाठी जाहिराती मागवल्या आहेत. लेटर हेडवर जाहिरातदारांना उद्देशून विजय दर्डांनी लिहिलंय, लोकमत दरवर्षी ‘दीपोत्सव’ आणि ‘दीपभव’ या दिवाळी अंकांच्या माध्यमातून लोकांना आनंद देतो. अनेक मोठ्या कंपन्या या अंकासाठी जाहिराती देतात. दोन्ही अंकांचा खप दोन लाखांहून जास्त आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाहिरात पोहोचवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. लोकमत (मराठी), लोकमत समाचार (हिंदी) मध्ये दीपोत्सव, दीपभव आणि दिवाळी विशेषांकात इनसाईड डबल स्प्रेड रंगीत जाहिरात २,७०,००० रुपयांमध्ये छापण्यात आम्हाला आनंद होईल’.

विजय दर्डा राज्यसभेचे खासदार आहेत. त्याचबरोबर संसदेच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांचेही सदस्य आहेत. असं असताना एखाद्या खासदार महाशयांनी आपल्या लेटर हेडचा उपयोग स्वतःचे खिसे भरण्यासाठी करणं योग्य आहे का? असा प्रश्न विचारला जातोय.


First Published: Wednesday, October 10, 2012, 20:48


comments powered by Disqus