Last Updated: Wednesday, April 24, 2013, 23:26
मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. म्हाडाच्या १२६०हून अधिक घरांसाठी उद्या जाहिरात निघणार आहे. १ मेपासून या घरांसाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होणार आहे. तर सहा मेपासून अनामत रक्कम भरण्यासाठी नेट बँकिंग सुविधा असणार आहे. २१ मे ही अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. ३१ मे रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे.