सर्वसामान्यांवर महागाईची कुऱ्हाड, Ms. inflation on the masses - bone

सर्वसामान्यांवर महागाईची कुऱ्हाड

सर्वसामान्यांवर महागाईची कुऱ्हाड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सर्वसामान्यांवर आधीच महागाईची कुऱ्हाड कोसळत असताना आता नोव्हेंबरअखेर किरकोळ किंमतींवर आधारित महागाई निर्देशांक ११.२४ टक्क्यांवर पोहोचलाय... गेल्या ९ महिन्यांमधला हा उच्चांक आहे... चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला धुव्वा, आणि येणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाई लक्षणीय वाढतेय... अर्थतज्ज्ञ, विश्लेषकांनी किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर हा ऑक्टोबरप्रमाणंच दोन अंकी स्तरावर राहील असा अंदाज व्यक्त केला होती.
मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबरअखेरीस किरकोळ किंमतींवर आधारित महागाई निर्देशांक ११.२४ टक्क्यांवर पोहोचलाय.

नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक तब्बल ६१.६ टक्यांनी भाज्यांच्या दरात वाढ झाली... महागाई भडका उडण्यासाठी भाज्यांची दरवाढ हे एक मुख्य कारण आहे... नोव्हेंबरमध्ये कडधान्यांच्या किंमती १२.०७ टक्के, डाळी १.२ टक्के आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये ९.०६ टक्क्यांनी वाढल्यायत... तर प्रथिनंयुक्त आहार असलेल्या अंडी, मांस आणि माशांच्या किंमतीत जवळपास १२ टक्क्यांनी वाढल्यायत.

एकंदर अन्न आणि पेय घटकांनी एकूण महागाईमध्ये १४.७२ टक्क्यांनी वाढ दर्शवली... या सर्व परिस्थितीमुळे दिल्ली शासनातल्या धोरणकर्त्यांवरील निवडणुकांचा दबाव वाढत जाणारेय... या सगळ्या महागाईवाढीचा गरिबांना प्रचंड फटका बसतोय... आणि त्याचा फटका आगामी निवडणुकीत काँग्रेसला बसण्याची शक्यताय.

आशिया खंडातली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था सध्या महागाईचा फटका सोसतेय... जगातल्या महागाई वाढत चाललेल्या देशामध्ये सध्या भारताचा समावेश आघाडीवर होतोय... देशाचा मंदावलेला विकास दर आणि महगाई यामध्ये जनता मात्र अडकलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 14, 2013, 16:11


comments powered by Disqus