सर्वसामान्यांवर महागाईची कुऱ्हाड

Last Updated: Saturday, December 14, 2013, 16:20

सर्वसामान्यांवर आधीच महागाईची कु-हाड कोसळत असताना आता नोव्हेंबरअखेर किरकोळ किंमतींवर आधारित महागाई निर्देशांक ११.२४ टक्क्यांवर पोहोचलाय... गेल्या ९ महिन्यांमधला हा उच्चांक आहे... चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला धुव्वा, आणि येणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाई लक्षणीय वाढतेय... अर्थतज्ज्ञ, विश्लेषकांनी किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर हा ऑक्टोबरप्रमाणंच दोन अंकी स्तरावर राहील असा अंदाज व्यक्त केला होती. मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबरअखेरीस किरकोळ किंमतींवर आधारित महागाई निर्देशांक ११.२४ टक्क्यांवर पोहोचलाय.

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाची जय्यत तयारी

Last Updated: Saturday, November 16, 2013, 09:39

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. शिवाजी पार्कातल्या स्मृतिउद्यानात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरातून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर दर्शन घेणार आहेत.

शतकातील सर्वात मोठा धूमकेतू दिणार २७ नोव्हेंबरला!

Last Updated: Friday, November 8, 2013, 17:17

शतकातील सर्वात मोठा धूमकेतू `आयसॉन`चे लवकरच दर्शन होणार आहे. २७ नोव्हेंबरला सूर्योदयापूर्वी २० मिनिटे हा धूमकेतू दिसेल. त्यामुळे खगोलप्रेमींना धूमकेतू पाहाण्याची संधी मिळणार आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या विविध पेन्टिंगसचं मुंबईत प्रदर्शन

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 22:09

शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध पेन्टिंगसचं प्रदर्शन नरीमन पॉईण्टमधल्या बजाज आर्ट गॅलरीत भरलं आहे. भारत टायगर या नव्या चित्रकारानं ही पेन्टिंगस साकारलीय आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 20:09

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा येत्या १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक तसेच व्हीआयपी शिवाजी पार्कवर येणार आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांची महिन्याच्या शेवटीही दिवाळी!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 15:47

यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असली तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. कारण...

दिवाळीनंतर सुरू होणार मुंबईकरांची `मोनो`वारी!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 08:12

अखेर अनेक डेडलाईन पार करणारी मोनो रेल्वे आता नोव्हेंबरमध्ये सुरु होणार असल्याचा छातीठोक दावा ‘एमएमआरडीए’नं केलाय.

पुढील महिन्यात मुंबईकरांना मोनोरेल यात्रा

Last Updated: Monday, October 7, 2013, 23:34

अखेर मुंबईकरांना मोनो रेल्वेमधून प्रवास करण्याची संधी नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे. मोनो रेल्वेची सर्व कामे पूर्ण झाली असल्याचा छातीठोक दावा एमएमआरडीएने केला आहे.

बालदिन... `गुगल डूडल` स्टाईलमध्ये!

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 15:33

१४ नोव्हेंबर... चाचा नेहरुंचा वाढदिवस... याचनिमित्तानं संपूर्ण देशभर बालदिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. याच आनंदात ‘गुगल’ही सहभागी झालंय... तेही थोड्या हटके स्टाईलनं.

१४ नोव्हेंबरला बॉम्बस्फोट घडविणार : हायअलर्ट जारी

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 19:19

पाकिस्तानातील कराची येथे तळ ठोकलेला इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी रियाझ भटकळ याने येत्या बुधवारी १४ नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीत ऐन दिवाळीत बॉम्बस्फोटांचा धमाका घडवण्याचा कट रचल्याची माहिती ‘रॉ’ने दिली.

बेळगाव महानगरपालिका बरखास्त

Last Updated: Thursday, December 15, 2011, 13:50

कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका बरखास्त केली आहे. मराठी भाषकांच्या ताब्यात असलेली महापालिका बरखास्तीचा आदेश कर्नाटक सरकारनं दिल्यानं मराठी भाषकांत संतापाची लाट उसळलीय.

काळा दिवस

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 05:44

बेळगावमध्ये गेल्या ५६ वर्षांपासून ०१ नोव्हेंबर हा काळादिवस साजरा केला जातो.. ०१ नोव्हेंबर १९५६ साली भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह ६५५ खेडी कर्नाटकने डांबून ठेवली.