Last Updated: Friday, April 11, 2014, 08:52
www.24taas.com, झी मीडिया, लखनऊसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी अकलेचे तारे तोडलेत. बलात्कार झाल्यावर फाशी कशाला द्यायला हवी, तरुणांकडून चुका होतात, असं संतापजनक वक्तव्य मुलायम सिंहांनी केलंय.
इतकंच नाही तर आम्ही सत्तेत आलो, तर बलात्काराच्या कायद्यात बदल करू, असं आश्वासन देऊनही मुलायम सिंह मोकळे झालेत.
मुलायम सिंहांच्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झालाय. एकप्रकारे मुलायम यांचं वक्तव्य म्हणजे बलात्कार करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहनच असल्याचं बोललं जातंय. आता त्यांच्या या वक्तव्यावर पुढं काय होतं, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
पाहा व्हिडिओ•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 10, 2014, 17:36