नारायण साई अजमेरमध्ये विवाहबद्ध..., narayan sai got married in ahamedabad

नारायण साई अजमेरमध्ये विवाहबद्ध...

नारायण साई अजमेरमध्ये विवाहबद्ध...
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सामूहिक बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणात प्रकरणातील आरोपी आणि गजाआड असलेल्या आसाराम बापूचा मुलगा नारायण साई अजूनही फरारच आहे. त्याचा शोध घेण्यासाठी गुजरात पोलिसांनी अजमेरही गाठलंय. नारायण साई, त्याची आरोपी पत्नी भावना आणि साधक कौशल ठाकूर उर्फ हनुमान सिंह यांचा शोध गुजरात पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी उद्यपूरहून अटक केलेल्या नारायण साईची सेविका गंगा हिनं दिलेल्या माहितीच्या आधारावर भावनाशी लग्न करण्याचा आणि मुलगा ‘मोक्ष’ याला दत्तक घेण्याच्या आरोपाची पडताळणी केली. परंतु, तीन दिवस शोध घेतल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही.

गंगा हिच्या म्हणण्यानुसार, २००६ ते २००९ मध्ये नारायण ऊर्फ नारायण साई ऊर्फ मोटा भगवान आणि जमना ऊर्फ भावना यांनी अजमेरमध्ये कोर्ट मॅरेज केले होते. २००९ नंतर त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं. त्याचं नाव मोक्ष ठेवलं गेलं. दत्तक घेण्याची प्रक्रिया ही अजमेरमध्येच करण्यात आली. गंगानं दिलेल्या या माहितीनंतर गुजरात पोलिसांनी महापालिकेच्या विवाह नोंदणी आणि मोक्षच्या जन्म प्रमाणपत्राचा शोध घेतला. परंतु पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 17, 2013, 15:56


comments powered by Disqus