नरेंद्र मोदींना विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून रोखणार?, Narendra Modi Narendra Vishwanath temple from

नरेंद्र मोदींना विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून रोखणार?

नरेंद्र मोदींना विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून रोखणार?
www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी

सध्या देशात भाजपचे नरेंद्र मोदींची हवा आहे. मोदी सध्या सभा, मेळावे घेण्यावर भर देत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी भाजपने आतापासून व्युहरचना करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना पुढे केले आहे. सभांनंतर आता मोदींच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात येणार आहे. मंदिरांचे शहर असणाऱ्या वाराणसी मधून ‘विजय शंखनाद रॅली’ काढण्यात येणार आहे. मात्र, वाराणसीमधील विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून मोदींना रोखण्याची अधिक शक्यता आहे.

मोदी प्रथम विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची शक्यता आहे. परंतु वाराणसीतील स्थानिक प्रशासनाने रॅलीच्या दिवशी विश्वनाथ मंदिर आणि संकटमोचक मंदिरात मोदींनी दर्शनासाठी जाऊ नये अशी विनंती केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी प्रांजल यादव यांनी सांगितले, मोदींना पत्र लिहून या सदर्भात विनंती केली आहे. रॅलीदरम्यान किमान तीन लाख लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या नमाजदेखील आहे. त्यामुळे गर्दी लक्षात घेऊन मोदीनी शुक्रवारी संकटमोचक मंदिर आणि विश्वनाथ मंदिरात दर्शन करू नये. कारण यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविणे अवघड होईल. त्यामुळे मोदींनी दर्शन घेणे टाळावे, अशी जिल्हाप्रशासनाची विनंती आहे.

आम्ही कोणत्याही व्यक्तीला मंदिरात दर्शन घेण्यापासून रोखू शकत नाही. जर का मोदीना संकटमोचक मंदिर आणि विश्वनाथ मंदिरात दर्शन घेयचेच असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. पण सुरक्षा व्यवस्थेच्यादृष्टीने त्यांनी याचा विचार करावा. मोदींनी रॅलीच्या दिवशी दर्शन घेऊ नये, अशी विनंती जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

गुजरात सरकारकडून एक पत्र मिळाले आहे. त्या पत्राला मंजुरी मिळण्यासाठी राज्यसरकारकडे पाठवण्यात आले होते. मात्र आतापर्यंत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर आलेले नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. दरम्यान, वाराणसी जिल्हा प्रशासनाने मोदीचा रॅली कार्यक्रम ठरवला आहे. त्यामुळे ते शुक्रवारी २० डिसेंबरला सर्वात अधी संकटमोचक मंदिर आणि विश्वनाथ मंदिरात दर्शन घेणार आहे. दर्शन घेऊन खजुरी गावाकडे रॅली निघणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 19, 2013, 19:17


comments powered by Disqus