कार्बन टायटेनियम S1 प्लस लॉन्च, सर्वात स्वस्त क्वॉड-कोर स्मार्टफोन!

Last Updated: Friday, June 20, 2014, 16:02

कार्बन टायटेनियम S1 प्लस भारतात ऑफिशिअली लॉन्च झालाय. क्वॉड-कोर प्रोसेसर असलेला हा देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

देशात तेलंगणा या 29व्या राज्याचा जन्म

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 07:28

देशात तेलंगणा या 29 व्या राज्याचा जन्म झालाय. या ऐतिहासिक क्षणी हैदराबादमध्ये तेलंगणावासियांनी जोरदार जल्लोष केला. ठिकठिकाणी फटाके फोडून, आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मिठाई आणि बिर्याणीचं वाटप करण्यात आलं.

सारंगखेड घोडे बाजारात पावणे दोन कोटींची उलाढाल

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 19:26

पुष्करच्या घोडे बाजारानंतर देशातील दुस-या क्रमाकाचा घोडा...बाजार म्हणून सारंगखेड्याचा घोडे बाजार ओळखला जातो.. यंदा या घोडेबाजारात जवळपास पावणेदोन कोटींची उलाढाल झालीय.. वाद्या आणि घुंगराच्या तालावर नाचणारा हा घोडा आहे धुळ्याच्या सारंगखेडा घोडेबाजारातला..

नरेंद्र मोदींना विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून रोखणार?

Last Updated: Thursday, December 19, 2013, 19:26

सध्या देशात भाजपचे नरेंद्र मोदींची हवा आहे. मोदी सध्या सभा, मेळावे घेण्यावर भर देत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी भाजपने आतापासून व्युहरचना करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना पुढे केले आहे. सभांनंतर आता मोदींच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात येणार आहे. मंदिरांचे शहर असणाऱ्या वाराणसी मधून ‘विजय शंखनाद रॅली’ काढण्यात येणार आहे. मात्र, वाराणसीमधील विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून मोदींना रोखण्याची अधिक शक्यता आहे.

काळा पैसा गुंतवण्यात भारत पाचव्या रँकवर!

Last Updated: Friday, December 13, 2013, 15:56

वेळेचं अन्न मिळत नसताना भारतातील श्रीमंत आणि भ्रष्टाचारी लोक हे भारतातून काळा पैसा परदेशात बरोबर पाठवत आहेत. आता ही आकडेवारी अब्जच्या घरात जाऊन पोहचली आहे. भारतातून २००२ ते २०११ या काळात तब्बल ३४३.०४ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा परदेशात गुंतविण्यात आला असून भारताचा जगात पाचवा क्रमांक असल्याचं इथल्या ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी (जीएफआय) या संस्थेच्या अहवालात म्हटलंय.

दहा देशातील गणपतीचे दर्शन मुंबईत

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 13:38

लोढा फाउंडेशनच्या वतीनं एक गणेश महोत्सव भरवण्यात आला आहे. भरवण्यात आलेल्या मुंबई गणेश महोत्सवात दहा देशांतील गणरायांचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन याठिकाणी गणेशभक्तांसाठी पालीचे मंदिर, हिमालयाची प्रतिकृती अशा अनेक गोष्टी उभारण्यात आल्या आहेत.

घसरला रुपया, वाढल्या समस्या!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 18:33

रुपयाच्या घसरणीमुळे परदेशात शिक्षण घेणा-या मुलांच्या पालकाचं आर्थिक गणित बिघडलय. तर ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवसायावरही 20 टक्के परिणाम झालाय.

छोटा राजनच्या पत्नीला कोर्टानं रोखलं!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 13:39

कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजन याची पत्नी सुजाता निकाळजे हिचा युनायटेड किंग्डमला जाण्यासाठी केलेला अर्ज कोर्टानं सोमवारी फेटाळून लावलाय.

पीडित चिमुरडीची प्रकृती चिंताजनक

Last Updated: Monday, April 22, 2013, 18:39

एका नराधमाच्या अमानूष अत्याचाराला बळी पडलेल्या मध्य प्रदेशच्या ४ वर्षाच्या चिमुरडीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्याने लहानगीच्या मेंदूला दुखापत झाल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलंय..

... ही आहे फासावर जाणारी देशातील पहिली महिला

Last Updated: Saturday, April 6, 2013, 12:19

मुखर्जी यांनी दिलेल्या निर्णयामुळे देशात पहिल्यांदाच एक महिला फासावर जाणार आहे.

`बिझी` सलमान उपचारांसाठी परदेशी जाणार...

Last Updated: Sunday, February 10, 2013, 15:54

बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानला उपचारासाठी परदेशात जाण्याची परवानगी आणि सवड मिळालीय.

देशात थंडीची लाट, दिल्ली गोठली

Last Updated: Monday, January 7, 2013, 12:28

देशात थंडीची लाट आलीय. तापमानात कमालीची घट झाल्याने दिल्ली, काश्मीर खोरे गोठून गेले आहे. दिल्लीत आज पहाटे अवघे १ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्र गारठला

Last Updated: Sunday, January 6, 2013, 08:48

राज्यात थंडीची हुडहुडी वाढली आहे. मुंबईचा पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने चांगलाच गारठा जाणवत आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे.

देशभरात थंडीची लाट

Last Updated: Monday, December 24, 2012, 09:47

देशभरात थंडीची लाट निर्माण झालीये. उत्तरेतल्या राज्यांमध्ये थंडीचा कहर सुरु आहे. जम्मू काश्मिरमध्ये पारा शुन्याचा खाली गेलाय.

पेणमध्ये गणेशमूर्तीतून २० कोटींची उलाढाल

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 22:25

गणपती मूर्ती तयार करण्यासाठी पेण प्रसिद्ध आहे. येथील गणेश मूर्ती देश-विदेशात नेल्या जातात. या ठिकाणी तब्बल ४५० कार्यशाळांमधून ११ लाखांहून अधिक गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना झाल्या आहेत. यातून यावर्षी २० कोटीं रूपयांची उलाढाल झाली आहे.

'ग्लोबल' गणेश

Last Updated: Saturday, August 4, 2012, 10:36

कोकणातील गणेशोत्सव खासच. अशाच गणेशोत्सवाची कोकणात सध्या लगबग सुरु आहे. एकीकडे बाप्पा दुबईला निघाले आहेत, तर दुसरीकडे संगमेश्वरमधून ऑस्ट्रेलियातल्या डार्लिंग हार्बरला मोदक निघाले आहेत.

देशातील खासगी डॉक्टर संपावर

Last Updated: Monday, June 25, 2012, 13:24

देशातील खासगी डॉक्टर आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहे. खासगी डॉक्टरांच्या देशव्यापी संपात पुण्यातील डॉक्टर्स देखील सहभागी झाले आहे . पुणे इंडियन डिकल असोसिएशननं मोर्चा काढून संपला पाठींबा दर्शवला.

देशात नेतृत्वाशिवाय काम - अझीम प्रेमजी

Last Updated: Thursday, June 14, 2012, 00:07

देश नेतृत्वाशिवाय काम करत असल्याची टीका प्रसिद्ध उद्योगपती आणि विप्रो उद्योग समूहाचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी केलीय. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे त्यांनी सरकावर क़डक शब्दांत ताशेरे ओढलेत.

ICSE परिक्षा, ठाण्याची शलाका देशात पहिली

Last Updated: Saturday, May 19, 2012, 18:03

आयसीएसई आणि आयएससी बोर्डानं आज आपले १० वी आणि १२ वीचे निकाल जाहीर केले. या परिक्षेत ठाण्याच्या शलाका कुलकर्णी आणि धनबादच्या माधवी सींगनं १० वीच्या परिक्षेत भारतातून पहिला क्रमांक पटकावला.

पाकिस्तानच दहशतवाद पसरवतोय- मुख्यमंत्री

Last Updated: Monday, May 14, 2012, 09:05

देशाची आर्थिक स्थिती सुधारू नये यासाठी पाकिस्तान देशात दहशतवाद पसरवत असल्याचं मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात 'ज्वालामुखी पाकिस्तान' या अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

'राज ठाकरे परदेशात जातात त्याचं काय'?

Last Updated: Thursday, May 3, 2012, 17:38

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आमदारांच्या परदेश दौऱ्याला विरोध केल्यानं राजकारणही तापलं आहे. राज स्वतः परदेशात जात नाहीत काय असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केला आहे.

उत्तर प्रदेशात ६० टक्के मतदान

Last Updated: Saturday, February 11, 2012, 23:14

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यासाठीचे ६० टक्के मतदान शांततेत पार पडले. मतदानासाठी सकाळी मतदानकेंद्रांसमोर रांगा लावल्या आहेत. यात एकूण एक कोटी ९७ लाख लोक मतदान करणार असून, ५९ मतदारसंघ आहेत.

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी मतदान

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 13:51

मायावतींच्या नेतृत्वाखालील सरकार आज उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांमध्ये मतदारांना सामोरं जात आहे. उत्तर प्रदेशच्या विधान सभेच्या ५५ जागांसाठी एक कोटी ७१ लाख मतदार आपला कौल देतील.

उत्तर प्रदेशात शस्त्रास्त्रे जप्त

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 14:00

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे पोलिसांनी आज अज्ञाताकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीत घातपात करण्याच्या उद्देशाने ही शस्त्रास्त्र आणली गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.