आता गहू १ तर तांदूळ २ रूपये किलो दराने, One kg of wheat rupee, two rupees One kg rice

आता गहू १ तर तांदूळ २ रूपये किलो दराने

आता गहू १ तर तांदूळ २ रूपये किलो दराने
www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ

जून महिन्यापासून गरिबांना आता १ रूपया प्रति किलो दराने तांदूळ तर २ रूपये किलो दराने गहू देण्यात येणार आहे. तसा निर्णय मध्यप्रदेशमधील शिवराज चौहान सरकारने घेतला आहे.

गरीब लोकांना एकाच भावाने १०० किलो गहू देण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी समाधान ऑनलाइन कार्यक्रमाच्यावेळी ही घोषणा केली. त्यामुळे आता यापुढे गरिबांना अल्प किमतीत धान्य मिळणार आहे. देशात मध्यप्रदेशन प्रथमच अशी घोषणा केला आहे.

चौहान यांनी गरिबांना स्वस्त धान्य देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना स्पष्ट बजावले आहे. त्याबाबत आदेशही दिले आहेत. गहू आणि तांदूळ याबरोबरच आयोडीनयुक्त मीठही एक रूपये प्रति किलो देण्यात येणार आहे. मीठ उपलब्ध करून देण्याबात सर्व तयारी करण्यात येईल, असे चौहान यांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 8, 2013, 15:53


comments powered by Disqus