`LBT` म्हंजे काय रं भाऊ? illiteracy about LBT

`LBT` म्हंजे काय रं भाऊ?

`LBT` म्हंजे काय रं भाऊ?
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी- चिंचवड

LBT ला व्यापा-यांचा जोरदार विरोध आहे. हा कर लाथा बुक्क्यांचा कर असल्याचं तर कधी ब्लॅक लॉ असल्याची टीका व्यापाऱ्यांनी केली आहे. पण या आंदोलनातील अनेक व्यापा-यांना LBT हे नेमकं प्रकरण काय आहे हे माहितीच नाही...त्यामुळे नेमका त्यांचा विरोध आहे तरी कशाला असा प्रश्न पडतो...

जे व्यापारी LBT ला विरोध करतायत, तो जाचक आहे असं सांगत आहेत आणि आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत, त्यातल्या अनेकांना LBT माहीतच नाही तर काहींना केवळ हिशेब ठेवावा लागतोय म्हणून तो जाचक वाटतोय. मुळात अनेक व्यापाऱ्यांना LBT माहित नाही ही बाब समोर येतेय. इन्स्पेक्टर राज येईल, शहरातल्या शहरात वस्तू खरेदी केली तरी कर लागेल अशा अनेक कल्पना व्यापा-यांच्या मनात आहेत आणि त्याच भीतीने अनेक जण संपात सहभागी झालेत.

मुळात LBT लागू होणार हे माहित असताना त्याबद्दल योग्य जनजागृती केलेली नाही ही सरकारची चूक तर काहीही माहिती नसताना संपात सहभागी होणं ही व्यापाऱ्यांची चूक...पण या सगळ्यात जनतेचे मात्र हाल होतायत....याची जाणीव सरकारला आणि तेवढ्याच प्रमाणात व्यापा-यांना कधी होणार हाच खरा सवाल आहे...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 8, 2013, 17:45


comments powered by Disqus