एलबीटीवर तोडगा काढा – शरद पवार, find solution to L B T - Sharad Pawar

एलबीटीवर तोडगा काढा – शरद पवार

एलबीटीवर तोडगा काढा – शरद पवार
www.24taas.com,झी मीडिया,सातारा

मुंबईच्या बाजारपेठा बंद राहणं हे अयोग्य आहे. एलबीटी प्रश्नी राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.

एलबीटीप्रकरणी मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय. व्यापारी आणि मुख्यमंत्री दोन्ही आपआपल्या मुद्यावर ठाम असल्यानं हा पेच चिघळलाय, त्यामुळे आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आता शरद पवार पुढे सरसावलेत.

एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जनतेला वेठाला न धरण्याचं आवाहन वारंवार केलंय. असं असतानाही व्यापाऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय. आता मनसे आणि शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.

एलबीटी विरोधातील व्यापा-यांच्या बंदचा परिणाम संपूर्ण राज्यभर तीव्रतेनं जाणवू लागलाय. गेल्या चार दिवसांपासून मुंबईत बंद सुरु आहे. एलबीटीविरोधात बेमुदत बंदवर पुण्याचे व्या पारी देखील ठाम आहेत. सरकार जीवनाश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई करू शकत नाही. या बंदमधून अत्याशवश्य्क सेवा वगळण्यावत आल्यारयत असं सांगत पुण्यानतल्या व्यापाऱ्यांनी सरकारला आवाहन दिलंय.

पिंपरी चिंचवड मध्येही एलबीटीला व्यापाऱ्यांचा जोरदार विरोध आहे. हा कर लाथा बुक्क्यांचा कर असल्याचं तर कधी ब्लॅक लॉ असल्याची टीका व्यापाऱ्यांनी केलीय. ठाण्यात ४० व्यावसायिक संघटनेनं आज बेमुदत बंद पुकारलाय. ठाण्यात व्यापा-यांनी शंभर टक्के बंद पाळलाय या बंद मध्ये किराणा, ठोक बाजार, पेट्रोल पंप यासह संपूर्ण व्यापार ठप्प आहे.

एलबीटीविरोधात व्यापा-यांच्या बंदचे परिणाम आता मुंबईत दिसू लागलेत. मुंबईत जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार सुरु झालाय.जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावानं विक्री होऊ लागलीये. काही व्यापाऱ्यांनी बंदचा फायदा उठवायला सुरुवात केलीये.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 9, 2013, 13:01


comments powered by Disqus