रेल्वेमंत्र्यांच्या भाच्याला लाच घेताना अटक, PK Bansal distances himself from arrested nephew

रेल्वेमंत्र्यांच्या भाच्याला लाच घेताना अटक

रेल्वेमंत्र्यांच्या भाच्याला लाच घेताना अटक
www.24taas.com, नवी दिल्ली

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या युपीए सरकारच्या अडचणी वाढतच चालल्यात.. वेगवेगळ्या मंत्र्यांची नावं विविध घोटाळ्यात समोर येतायत... त्यातच आता रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या भाच्याला ९० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने अटक केलीय. त्यामुळं सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांना आयतं कोलीत सापडलंय...

दुसरीकडे कोळसा घोटाळाप्रकरणी कायदामंत्री अश्विनीकुमार अडचणीत सापडलेत.. विरोधकांकडून अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय.. रेल्वेतील प्रमोशनसाठी लाच घेतल्याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असा दावा रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी केलाय. बन्सल याचा भाचा विजय सिंगला याला ९० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं काल अटक केलीय.

आकर्षक ठिकाणी प्रमोशन मिळावं यासाठी रेल्वे मंडळाचे सदस्य महेश कुमार यांनी बन्सल यांचा भाचा विजय सिंगला याच्यासह २ कोटी रुपयांची डील केली होती.. या डीलचे ९० लाख रुपये देण्यासाठी जाताना सीबीआयनं महेशकुमार यांना पकडलं आणि विजय सिंगला यांना अटक करण्यात आली.. महेश कुमार हे रेल्वेच्या पश्चिम विभागाचे सरव्यवस्थापक होते.. नुकताच त्यांनी रेल्वे मंडळाच्या सदस्यपदाची सूत्रं स्वीकारली होती..

९० लाखांची रोकड घेऊन जात असताना महेश कुमार यांना अटक करण्यात आली... ही रक्कम सिंगला यांच्यासाठी असल्याचं महेश कुमार यांनी चौकशीत कबूल केलंय... या दोघांसह संदीप गोयल आणि मंजुनाथ नावाच्या व्यक्तींनाही अटक करण्यात आलीय...

First Published: Saturday, May 4, 2013, 11:03


comments powered by Disqus