रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक, Railways and arrested in bribery case

रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक

रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सीबीआयने रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे. रेल्वेलाचप्रकरणी आतापर्यंत सात लोकांना अटक करण्यात आली आहे.

सीबीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले की, राहुल यादव याला अटक करण्यात आली आहे. याआधी दोन कुरिअर बॉयना अटक केली होती. रेल्वे मंडळ सदस्य पदोन्नती देण्यासाठी ९० लाख रूपयांची लाच घेण्यात आली होती.

या प्रकरणात रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल यांचा भाचा विजय सिंग याला अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर पवनकुमार बन्सल अडचणीत आले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागण्या विरोधकांनी केली आहे. ते राजीनामा देणार का, याचीच उत्सुकता आहे.

First Published: Sunday, May 5, 2013, 09:06


comments powered by Disqus