जाब विचारणाऱ्या तरूणीला पोलिसाने मारली थोबाडीत, police beaten girl in hospital

जाब विचारणाऱ्या तरूणीला पोलिसाने मारली थोबाडीत

जाब विचारणाऱ्या तरूणीला पोलिसाने मारली थोबाडीत
www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीत पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. या संतापजनक कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि पोलिसांना जाब विचारण्यासाठी काही महिला पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. त्यावेळी त्यांना नीट उत्तरं द्यायची सोडून पोलिसांनी चक्क महिलांच्याच थोबाडीत मारली....

मुळात दिल्लीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार होतो. पोलीस तो थांबवू शकत नाहीत. पण त्याचा निषेध करणा-या महिलांवरही पोलीस चक्क हात उगारतात, हे धक्कादायक चित्रं मुलींवर बलात्कार आणि महिलांवरचे अत्याचार सुरूच असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.

पाच वर्षांच्या चिमुरडीला तब्बल ४० तास एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं होतं. तिथून सुटका केल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या शरिरामध्ये तीन मेणबत्या आणि काचेचे तुकडे आढळले आहेत. त्यावरून आरोपी किती विकृत असावा, याची कल्पना येऊ शकेल.

First Published: Friday, April 19, 2013, 23:19


comments powered by Disqus