Last Updated: Friday, April 19, 2013, 22:54
www.24taas.com, नवी दिल्लीमी पिंकी.... तुम्ही मला गुड्डी, डॉली, स्वीटी, मुन्नी काहीही म्हणू शकता..... कारण तुमच्या सगळ्यांच्या घरात अशाच लाडाच्या नावानं मला हाक मारता.... मी फक्त पाच वर्षांची आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणींसारखंच मलाही शाळेत जायचंय. त्यांच्याबरोबर खेळायचंय..... पण मी यापैकी काहीच करु शकत नाही. .....
कारण मी हॉस्पिटलमध्ये आहे ना.... सगळे म्हणतात माझ्याबरोबर खूप वाईट झालं.... मला तर माहीत पण नाही, की त्या काकांनी माझ्याबरोबर काय केलं..... मी तर नेहमीसारखी खेळायला गेले होते. पण तेव्हाच काहीतरी झालं.... मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझे आई-बाबा खूप रडत होते. मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले..... पुन्हा सगळे तेच म्हणत होते...
माझ्याबरोबर खूप वाईट झालं.. पण असं काय झालंय.... का झालंय....मी कुणाला काहीच त्रास दिला नव्हता. मला बरं व्हायचंय.... मला माझ्या मैत्रिणींसारखं जगता येईल का.... मला शाळेत जायचंय.... मैत्रिणींबरोबर खूप खेळायचंय... मी बरी होईन का.....
First Published: Friday, April 19, 2013, 22:54