Last Updated: Friday, February 28, 2014, 11:56
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू नवनवीन संशोधनामुळे संपूर्ण जग आता विज्ञान क्षेत्रात चांगलीच प्रगती करत आहे. पण आजही भोंदूबाबांवर विश्वास ठेवणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. अशीच एक धक्कदायक घटना कर्नाटकामधील बेळगावमध्ये घडली. झुंजरवाड येथे मंगळवारी रात्री १ वाजता ७ वर्षीय मुलीवर जीवघेणा अघोरी प्रकार एका भोंदूबाबाने केल्याचे उघड झाले आहे.
५० वर्षीय भोंदूबाबाचा असा दावा होता की, मुलींला जिंवत जाळले. तर ती महाशिवरात्रीला पुर्नजन्म घेईल. यासाठी त्याने एका परिवाराला आपल्या बोलण्यात फसवलं. या परिवारातील ७ वर्षीय मुलीला चितेजवळ एका खड्यात पुरण्यात आले.
भोंदूबाबांने या खड्यावर चिता रचण्याची सर्व तयारी केली. लाकडे पेटविण्यास सुरूवात केली. तेवढ्यात तेथे पोलीस पोहोचले. पोलिसांनी भोंदूबाबाचा कट उधळून लावला आणि त्या मुलींचे प्राण वाचविले.
मला माझ्या आईवडिलांनी या आश्रमात घेऊन आले. गेल्यावर्षापासून मला मठात ठेवण्यात आले आहे. २२ दिवसांपासून मला खड्ड्यात ठेवले आहे. मला काही माहीत नाही, असे त्या निरागस मुलींने पोलिसांना सांगितले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 27, 2014, 11:47