यूपीचे सीएम राहुल गांधी, राजधानी दिल्ली, rahul gandhi cm of up

यूपीचे सीएम राहुल गांधी, राजधानी दिल्ली

यूपीचे सीएम राहुल गांधी, राजधानी दिल्ली
www.24taas.com झी मीडिया, लखनऊ

लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या राज्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर निघाले. या दौऱ्यात त्यांना दिवसाच्या सुरूवातीलाच कटू सत्याला सामोरे जावे लागले. एका शाळेतील मुलाला मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशची राजधानी कोणती? असे विचारल्यावर ‘लखनऊ’ हे उत्तर न मिळता ‘दिल्ली’ हे उत्तर मिळाले.

सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या लोहीया ग्राम विकास योजनाद्वारे गावांमध्ये राबविण्यात आलेल्या विकास कार्यांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बछरावा विधानसभा मतदारसंघाला भेट दिली. ग्राम पंचायतीत पोहोचत असतांना अखिलेश यादव यांना रस्त्यांची दूरवस्था, वीजपुरवठ्याची समस्या आदी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण यांचा त्यांना अंदाज होताच...

तसेच सरकारी शाळेतील मुलांचे सामान्य ज्ञान पाहता त्यांनी आपली मानच खाली घातली. शाळेतील मुलांचे ज्ञान ऐवढे कमी असेल, असे त्यांना मुळीच वाटले नव्हते. अखिलेश यादव यांनी विधानसभा मतदार संघ भेटीनंतर अचानकच स्थानिक माध्यमिक शाळेत पोहोचले. त्यांनी तेथे माध्यांत भोजनाची माहिती घेतली आणि त्यानंतर सातवीच्या वर्गात प्रवेश केला.

त्या वर्गात आपली ओळख न सांगतांच मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एका विद्यार्थाला विचारले की, उत्तरप्रदेशची राजधानी कोणती? यावर त्या विद्यार्थाने उत्तर दिले ‘दिल्ली’. हे ऐकून मुख्यमंत्र्यांनी आपली मानच खाली घातली. मुख्यमंत्र्याबरोबर असणाऱ्या एका अधिकाऱ्याने अखिलेश यादव यांच्याकडे इशारा करत विचारले की, “हे कौन आहेत?, विद्यार्थाचे उत्तर धक्का बसण्यासारखे होते. ते म्हणजे, उत्तर होते ‘राहुल गांधी’... हे ऐकून तर मुख्यमंत्री अखिलेश हे हसायलाच लागले.

सरकारी शिक्षणांची ही अवस्था पाहून त्यांनी शिक्षणाधिकारी ज्ञानेंद्र प्रताप सिंग भदोरीया यांची चांगलीच कानउघडणी केली. शिक्षणाबाबतची नाराजी व्यक्त करून निष्काळजीपणा केल्याने त्यांच्या बदलीचा आदेश काढला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 9, 2013, 11:23


comments powered by Disqus