स्वाती चिखलीकरच्या लॉकर्समध्ये ९ किलो सोनं

Last Updated: Thursday, May 9, 2013, 19:12

नाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता यांच्याकडे कोट्यवधीची बेहिशोबी संपत्ता सापडली. अभियंता सतीश चिखलीकर आणि वाघ यांना अटक करण्यात आलेय. स्वाती चिखलीकर हिच्या नगर जिल्ह्यातल्या बँक लॉकर्समध्ये अंदाजे सव्वातीन कोटींची मालमत्ता सापडलीये.

रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक

Last Updated: Sunday, May 5, 2013, 09:06

सीबीआयने रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे. रेल्वेलाचप्रकरणी आतापर्यंत सात लोकांना अटक करण्यात आली आहे.

लाचप्रकरण: बंगारुंना पाच वर्षांची शिक्षा?

Last Updated: Saturday, April 28, 2012, 15:14

लाचखोरी प्रकरणी तत्कालिन भाजप अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना दोषी ठरवण्यात आले आहे. बंगारु यांच्या शिक्षेबाबत कोर्टात चर्चा झाली. बंगारुंना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली आहे.

लष्करप्रमुख लाचप्रकरणी राज्यसभेत खडाजंगी

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 16:02

सहाशे दुय्यम दर्जाच्या गाड्या खरेदी करण्यासाठी लष्करप्रमुख जनरल व्ही. के सिंह यानी केलेल्या १४ कोटी रूपयांच्या लाचप्रकरणी आज राज्यसभेत पुन्हा एकदा खडाजंगी झाली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोषणाबाजी झाली.

कन्हैय्यालाल गिडवाणींना पुन्हा अटक

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 16:42

आदर्श घोटाळ्याप्रकरणी कन्हैय्यालाल गिडवाणींना पुन्हा सीबीआयने अटक केली. घोटाळ्यातील आरोप सौम्य करण्यासाठी गिडवाणी यांनी लाच दिली होती. याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची आज जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. परंतु आज पुन्हा सीबीआयने त्यांना अटक केली. आज दिवसभरात चार जणांना अटक झाली आहे.

काँग्रेसमधून कन्नैयालाल गिडवाणी निलंबित

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 22:47

कन्नैयालाल गिडवाणी यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. कालच त्यांना लाचप्रकरणात अटक करण्यात आली होती. काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज केली.

कन्हैयालाल गिडवानीसह चौघांना अटक

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:55

मुंबईतील आदर्श घोटाळा प्रकरणातील आरोप सौम्य करण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी, त्यांचा मुलगा कैलास आणि दोन वकीलांना सीबीआयने अटक केली आहे.