राम जेठमलानींची भाजपमधून हकालपट्टी, Ram jethmalhani Suspend form BJP

राम जेठमलानींची भाजपमधून हकालपट्टी

राम जेठमलानींची भाजपमधून हकालपट्टी
www.24taas.com, नवी दिल्ली

भाजपा अध्यक्ष नितीन गडकरींवर सातत्यानं टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणा-या खासदार राम जेठमलानींची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय.

भाजपच्या संसदीय दलाची सोमवारी बैठक होणार आहे, त्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. राम जेठमलानींच्या वक्तव्यामुळे पक्षाचं नुकसान झालं असून, पक्षाच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम झाल्याचं पक्षाचे प्रवक्ते शहानवाज हुसैन यांनी म्हटलंय. आपल्याला काढून टाकण्याची हिम्मत कोणातच नाही, अशा शब्दांत राम जेठमलानींनी पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान दिलं होतं.

तसंच सीबीआयच्या संचालकांच्या नियुक्तीवर भाजपनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र जेठमलानींनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत सीबीआय संचालकांची नियुक्ती योग्य असल्याचं म्हटलं होतं.

First Published: Monday, November 26, 2012, 00:08


comments powered by Disqus