दिल्लीत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलावरच सामूहिक बलात्कार!! Rape on boy in Delhi

दिल्लीत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलावरच सामूहिक बलात्कार!

दिल्लीत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलावरच सामूहिक बलात्कार!
www.24taas.com, नवी दिल्ली

काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये घडलेल्या गँगरेप नंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावर पोलीस काय करत आहेत, असा सवालही उठवला जात होता. मात्र आता अशी घटना घडली आहे की त्यामुळे दिल्लीतील विकृत मानसिकता पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे. दिल्लीमध्ये एका आयजी ऑफिसरच्या १७ वर्षीय मुलावर त्याच्या मित्रांनी बलात्कार केला आहे.

दिल्लीतील पोलीस अधिकारी आपल्या पत्नीसोबत काही दिवसांसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी घरात केवळ त्यांचा १७ वर्षीय मुलगा आणि मोलकरीण दोघेच होते. मुलाने आई वडील घरी नसल्यामुळे मित्रांना बोलवून घरीच मोठी पार्टी आयोजित केली. या पार्टीत सर्वांनी भरपूर दारू प्यायली. पार्टीनंतर इतर मित्र घरी निघून गेले. मात्र फाहिम आणि जॉनी हे दोन मित्र मात्र त्याच्याच घरी थांबले. आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलासोबत जबरदस्ती करण्यास सुरूवात केली आणि त्याच्यावर बलात्कार केला. जाताना त्यांनी घरातील काही वस्तूंवरही डल्ला मारला.



काही दिवसांनी पोलीस अधिकारी घरी परतल्यावर त्यांनी घरातून गहाळ झालेल्या वस्तूंसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांना चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांच्या अल्पवयीन मुलावर झालेल्या बलात्काराची माहिती मिळाली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

First Published: Friday, March 1, 2013, 17:16


comments powered by Disqus