या वर्षीचे सर्वाधिक श्रीमंत भारतीय richest Indians of India

या वर्षीचे सर्वाधिक श्रीमंत भारतीय

या वर्षीचे सर्वाधिक श्रीमंत भारतीय
www.24taas.com, नवी दिल्ली

सलग पाचव्या वर्षीही मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय ठरले आहेत. फोर्ब्स मासिकाने नुकतीच श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. यात मुकेश अंबानी पुन्हा अव्वाल स्थानावर आहेत. खरंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या संपत्तीत घट होत आहे. मात्र नुकसान होत असूनही त्यांची संपत्ती २१ अब्ज डॉलर्स एवढी अहे.

गेल्यावर्षी त्यांच्या संपत्तीत १.६ अब्ज डॉलर्सचा खड्डा पडला आहे. तरीही त्यांच्या रिलायन्स कंपनीचं बाजार भांडवल पाहाता मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत.

स्टील जायंट लक्ष्मी मित्तल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १६ अब्ज डॉलर्स एवढी आहे. त्यांचंही गेल्या वर्षी ३.२ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. गेल्यावर्षी युरोपमधील भाववाढीचा फटका त्यांच्या अर्सेनल स्टीलच्या शेअर्सला बसला होता.

आऊटसोर्सिंगचे जनक विप्रोचे मालक अझिम प्रेमजी हे या यादीत तिसऱ्या नंबरवर आहेत. त्यांची संपत्ती १२ अब्ज डॉलर्स एवढी असून त्यांनाही गेल्यावर्षी ८०० दशलक्ष डॉलर्सचं नुकसान सोसावं लागलं आहे.

भारतातील १० सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी

1. मुकेश अंबानी- $ २१ अब्ज
2. लक्ष्मी मित्तल- $ १६ अब्ज
3. अझिम प्रेमजी- $ १२.२ अब्ज
4. पालनजी मेस्त्री- $ ९.८ अब्ज
5. दिलीप सांघवी- $ ९.२ अब्ज
6. आदि गोदरेज- $ ९ अब्ज
7. सावित्री जिंदाल- $ ८.२ अब्ज
8. शशी आणि रवी रुजा- $ ८.१ अब्ज
9. हिंदुजा ब्रदर्स- $ ८ अब्ज
10. कुमार मंगलम बिर्ला- $ ७.८ अब्ज

First Published: Thursday, October 25, 2012, 11:58


comments powered by Disqus