Last Updated: Thursday, December 13, 2012, 17:36
www.24taas.com, नवी दिल्लीमोबाईल फोनधारकांसाठी खुशखबर.... आगामी २०१३ मध्ये देशभऱात कुठेही रोमिंग चार्जेस लागणार नाही. बुधवारी दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संपूर्ण देशात रोमिंग फ्री करण्याचा निर्णय मात्र कॅबिनेटच्या मंजूरीनंतरच लागू होईल असे सिब्बल यांनी सांगितले आहे. कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव दूरसंचार मंत्रालयाकडे येईल आणि त्यानंतर हा निर्णय देशभरात लागू करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मात्र, सध्या सुरू असलेल्या गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांनंतर ही घोषणा होण्याची शक्यता आहे. रोमिंग फ्री १ जानेवारीपासून होईल का याबाबत सिब्बल यांनी स्पष्ट माहिती दिली नाही.
केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरूवातीला आपल्या राष्ट्रीय दूरसंचार धोरण २०१२मध्ये एक देश, फ्री रोमिंगची घोषणा केली होती. हे धोरण मे,२०१२मध्ये स्वीकारण्यात आले आहे.
First Published: Thursday, December 13, 2012, 17:36