Last Updated: Monday, October 15, 2012, 23:16
www.24taas.com, गांधीनगरऐन गुजरात निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदींचे विरोधक आणि भाजपचे माजी सरचिटणीस संजय जोशी पुन्हा आक्रमक झाले आहेत. गुजरात दौ-यावर असलेल्या संजय जोशी यांनी गुजरातमध्ये पक्षातल्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असलेल्या अनेक असंतुष्ट नेत्यांचा यात समावेश होता.
अहमदाबाद, नवसारी आणि सुरत जिल्ह्यांत अनेक संघ कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांची त्यांनी भेट घेतली. यात बरेचसे जण हे मोदींवर नाराज असल्याची माहिती आहे. केशुभाई पटेल यांच्या गुजरात परिवर्तन पार्टीत आणि भाजपात संघाची मतं विभागली जातील का, अशी विचारणा केली असता. त्यांनी राजकीय हास्य करत प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय. मात्र या हास्यात बरचं काही होतं.
संजय उवाच याच वाक्यानं.. महाभारताची सुरुवात झाली होती.. आता संजय जोशींच्या हसण्यात बरचं काही होतं. या नव्या संजय उवाचंनं गुजरातेत नव्या महाभारताची नांदी झाली आहे, असं म्हणल्यास वावगं ठरु नये. गुजरातच्या रणधुमाळीत कुणाच्या पाठिशी कोम उभं राहणार, असा नवा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित झालाय..
First Published: Monday, October 15, 2012, 23:16