Last Updated: Wednesday, May 7, 2014, 13:31
www.24taas.com, झी मीडिया, रांची रांचीयेथील हजारीबागमध्ये एक बलात्काराची घटना समोर आली आहे. हजारीबागमध्ये एका मुलीवर तिच्याच मित्राने बालात्कार केला. मुलीने आरडाओरडा केल्यावर दोन तरूण तिथे आले. पण या दोन व्यक्तींनी देखील त्या मुलीवर बालात्कार करण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा या मुलीने 80 फुटावरून उडी मारली.
हजारीबाग येथील एका हॉस्टेलमध्ये ही पीडित मुलगी राहते. या मुलीची एका महिन्यापूर्वी खिरगांव येथे राहणाऱ्या नवाब नावाच्या तरूणासोबत मैत्री झाली. नवाब खाजगी बसचा चालक आहे. फिरण्याचं निमित्त करून नवाबने पीडित तरुणीला हजारीबाग तलाव परिसरात नेलं. तिथे तिच्यावर जबरदस्ती करून बलात्कार केला.
मुलीने आरडाओरडा केल्यावर तेथे दोन तरूण आले. त्यांना पाहून नवाब पळून गेला. पण नंतर या दोन तरूणांची वृत्ती बदलल्याने, त्यांनीच तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने अखेर नकार देत, सरळ 80 फुट उंचीवरून दरीत उडी मारली.
दरीत झाडांमध्ये अडकून पडलेल्या तरूणीला पोलिसांनी वाचवले आणि रांची येथील रिम्सयेथे उपचारासाठी दाखल केले. मुलीची प्रकृती गंभीर आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणातील तीन ही आरोपींना अटक केली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 7, 2014, 13:31