सोनिया गांधींचा अमेरीकेला पासपोर्ट देण्यास नकार Soniya gandhi ignore to gives passport to america

सोनिया गांधींचा अमेरीकेला पासपोर्ट देण्यास नकार

सोनिया गांधींचा अमेरीकेला पासपोर्ट देण्यास नकार
www.24taas.com,झी मीडिया,न्यू यॉर्क

अमेरीकेत सोनिया गांधी यांनी १९८४च्या शीखविरोधी दंगली बाबत सुरू असलेल्या एका प्रकरणात साक्षीचे पुरावे म्हणून स्वत:चे पारपत्र(पासपोर्ट)ची प्रत जमा करण्यास नकार दिला आहे. यासाठी सोनिया गांधींनी भारत सरकारतर्फे पुरवण्यात येणारी सुरक्षा तसेच गोपनीयतेचा आधार घेतला आहे. अमेरिकेचे डिस्ट्रिक्ट जज ब्रायन कोगन यांनी मागील महिन्यात सोनिया गांधींना ७ एप्रिलपर्यंत त्यांचे पुरावे न्यायालयात जमा करण्यास सांगितले होते. यावरुन अमेरीका त्यांच्या उपस्थितीबाबत निश्चित निर्णय घेऊ शकेल.

न्यायालयाचा हा आदेश १९८४च्या शीख विरोधी दंगलीच्या एका प्रकरणात देण्यात आला आहे. ‘सिख फॉर जस्टिस’(एसएफजे) नावाच्या एका संघटनेने न्यायालयात हा खटला चालवला आहे.

या प्रकरणात दावा करण्यात आला आहे की, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सोनिया गांधी प्रकृती तपासणीसाठी अमेरीकेच्या मेमोरियल स्लोन-कैटरिंग कैंसर सेंटरमध्ये आल्या होत्या. त्यावेळी न्यायालयाने सोनिया गांधींना समन्स पाठवलं होत. एसएफजे संघटनेच्या दाव्यानुसार ९ सप्टेंबर रोजी सोनिया गांधी अमेरीकामध्येच होत्या. पण सोनिया गांधींनी या गोष्टीचा नकार दिला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 8, 2014, 17:20


comments powered by Disqus