सेक्स स्कँडल : खटला मागे घेण्याच्या बदल्यात काय हवंय?, Tarun Tejpal`s relative asked what I `wanted`

सेक्स स्कँडल : `खटला मागे घेण्याच्या बदल्यात काय हवंय?`

सेक्स स्कँडल : `खटला मागे घेण्याच्या बदल्यात काय हवंय?`

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

तरुण तेजपाल सेक्स स्कॅन्डल प्रकरणाला आता आणखी एक वळण मिळालंय. तरुण तेजपालचे नातेवाईक माझ्या कुटुंबीयांना सतत संपर्क करत आहेत आणि माझ्या आईवर तेजपालला वाचविण्यासाठी दबाव टाकत आहेत, असा दावा पीडित मुलीनं शनिवारी केलाय. तेजपालच्या जवळच्या लोकांकडून आपल्यावरही खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं तीनं म्हटलंय.

पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार यानंतर तिच्यावर दबाव खूप वाढलाय. ‘खटला मागे घेण्याच्या बदल्यात तुम्हाला काय हवंय’ अशी विचारणाही संबंधित मुलीच्या आईकडे करण्यात आल्याचं तीनं म्हटलंय.

दुसरीकडे, या प्रकरणाची चौकशी करणारे गोवा पोलीस ‘तहलका’च्या कार्यालयात धडकले. पोलिसांच्या एका टीमनं ‘तहलका’च्या मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरी यांचीही चौकशी केली. गोवा पोलीस सायंकाळी पाच वाजल्यापासून तहलकाच्या कार्यालयात आहेत. पीडित मुलीनं केलेल्या तक्रारीवर पुरावे मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सूरू आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुण तेजपाल कुठे गायब झालाय, याची माहिती पोलिसांकडे नाही. त्यामुळे, तेजपाल सध्या कुठे असू शकतात? याचीही चौकशी पोलिसांनी शोमाकडे केलीय. त्यामुळे गरज भासल्यास पोलीस तात्काळ त्याच्याशी संपर्क साधू शकतात.

पुढच्या काही तासांत पोलीस तरुण तेजपालला अटक करण्याच्या तयारीत आहेत, असं समजलं जातंय. प्रकरणाचा तपासही काहीसा असाच इशारा करतोय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 23, 2013, 21:18


comments powered by Disqus