Last Updated: Monday, May 14, 2012, 18:11
www.24taas.com, जयपूरआमिर खानने 'सत्यमेव जयते' या शो मधून स्त्री भ्रृणहत्या सारखा संवेदनशील विषय हाताळून राजस्थानची बदनामी केली असून असे भावनिक मुद्द्यांना मनोरंजनाचे साधन बनविल्याची जळजळीत टीका राजस्थानचे आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजकुमार शर्मा यांनी केली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे एकीकडे 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना तोंड फोडणा-या आमिर खानचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच राज्याचे एक मंत्री आमिरची टीका करताना दिसत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत राजस्थानची परिस्थिती चांगली असल्याचेही राजकुमार यांनी सांगितले आहे. राज्य सरकार याप्रकरणी पहिल्यापासूनच काम करीत आहे.
आमिरने भ्रृणहत्येसारख्या गंभीर मुद्दालादेखील मनोरजंनाचे साधन बनवले असल्याचेही शर्मा यांनी म्हटले. आमिरने आपण सामाजिक कार्यकर्ते नसल्याचे आधीच सांगितले आहे. आमिर प्रत्येक शो साठी तीन कोटी रूपये घेतो. मिळालेल्या माहितीनुसार त्याने या शोमधून आतापर्यंत 20 कोटी रूपये कमावले आहेत.
First Published: Monday, May 14, 2012, 18:11