हरियाणात विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार - Marathi News 24taas.com

हरियाणात विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार

www.24taas.com, चंडीगढ
 
हरियाणामधील सोनिपत जवळील भगत फूल सिंग महिला विश्वविद्यालयातील विद्यार्थिनीवर चार तरुणांनी समुहिक बलात्कार केला आहे. ही मुलगी कॉलेजमध्ये विधीशास्त्राच्या प्रथम वर्षाला शिकत होती. कॉलेजजवळील हॉस्टेलवरच ती राहात होती. पिडीत तरुणीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. या चार तरूणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉलेज परिसरात कँटिन चालवणाऱ्या आमित नामक तरुण बुधवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत स्कॉर्पियो यूएसव्ही चालवत होता. याच वेळी तरुणी बाजारातून येत होती. तरुणांनी तिला खेचून कारमध्ये बसवलं. गुरुवारपर्यंत तिला कारमध्ये बंद करुन ठेवलं होतं. या चार तरुणांनी तिचा सुहिक बलात्कार केला आणि गुरुवारी संध्याकाळी तिला युनिव्हर्सिटीच्या गेटपाशी फेकून दिलं.
 
या सर्व घटनेची माहिती यूनिव्हर्सिटीचे कुलगुरू पंकज मित्तल यांना देण्यात आली. या तरुणांना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्याविरोधात कडक कारवाई व्हावी यासाठी युनिव्हर्सीतील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सोनिपत- गोहाना मार्गावरील वाहतूकही रोखून धरली होती.
 

First Published: Saturday, May 19, 2012, 10:27


comments powered by Disqus