हंपी एक्सप्रेसला भीषण अपघात - Marathi News 24taas.com

हंपी एक्सप्रेसला भीषण अपघात

www.24taas.com, बंगळुरू
 
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील पेनीगोंडा स्टेशनवर बंगळुरु हंपी एक्स्प्रेसला भीषण अपघात झालाय. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झालाय. अपघातात 9 जणांचा मृत्यू झालाय. तर 25 जण जखमी झालेत.
 
आज पहाटे साडे तीनच्या सुमारास बंगळुरु हंपी एक्स्प्रेस मालगाडीला धडकली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पहिल्या बोगीला आग लागली. मालगाडी धडक बसल्यामुळे पहिल्या बोगीत शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. ही आग आता नियंत्रणात आली आहे. दुर्घटनाग्रस्त डब्याला आग लागल्यानं बचावकार्यात प्रचंड अडचणी येत आहेत.
 
या अपघातात इंजिनजवळील पहिल्या ते तिसऱ्या बोगीला सर्वांत जास्त नुकसान झालं आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना पेनागोंडा आणि अनंतपूर येथील इस्पितळांत दाखल करण्यात आलं आहे. आगीमुळं मृतांची संख्य़ा वाढण्य़ाची भीती व्यक्त करण्यात येतेय.

First Published: Tuesday, May 22, 2012, 09:34


comments powered by Disqus