Last Updated: Saturday, December 10, 2011, 04:23
झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी 
संसदेत लोकपाल बिलावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे लोकपाल बिल सक्षम असावे यासाठी अण्णा हजारे उद्या पुन्हा एकदा एका दिवस उपोषण करणार आहेत. त्यासाठी त्यांनी आज सकाळी राळेगणसिद्धीहून दिल्लीकडे रवाना झाले. पत्रकारांशी संवाद साधताना अण्णांनी पुन्हा एकदा सरकारला टिकेचे लक्ष केले.
अण्णांनी सरकारवर भष्ट्राचारी असण्याचे आरोप केले आहे. कारण की देशात आजही भ्रष्टाचार, लुटमार सुरू आहे. त्यामुळे या लढाई मध्ये अनेकांना आपले रक्त सांडावे लागेल असे देखील अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. जनलोकपालसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल, असा निर्धार व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा सरकारशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालेत. अण्णा राळेगणसिद्धीहून आज दिल्लीकडे रवाना झालेत.
अण्णा नवी दिल्लीतल्या जंतरमंतरवर उद्या एक दिवसाचं उपोषण करणार आहेत. जनलोकपालसाठीची ही लढाई स्वातंत्र्याची दुसरी लढाई असल्याचानिर्धार अण्णांनी व्यक्त केलाय. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी अण्णांचं औक्षण करण्यात आलं.
First Published: Saturday, December 10, 2011, 04:23