केशूभाईंनी ओकलं गरळ, म्हणे मोदी 'सडकं फळ'! - Marathi News 24taas.com

केशूभाईंनी ओकलं गरळ, म्हणे मोदी 'सडकं फळ'!

www.24taas.com, राजकोट
 
गुजराथचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर आगपाखड केली आहे. गेल्यावेळी मोदींना हिटलरची उपमा देऊन झाल्यावर यावेळी केशूभाईंनी मोदींना सडक्या फळाची उपमा केली आहे. नरेंद्र मोदी म्हणजे सडकं फळ असून त्यांना फेकून दिलं पाहिजे असं वक्तव्य केशूभाईंनी केलं आहे.
 
परिवर्तन संमेलनादरम्यान राजकोटमध्ये आयोजित केलेल्या रॅलीत केशूभाईंनी मोदी सरकार आपला सगळा राग काढला. नरेंद्र मोदी यांची गेंड्याची कातडी असून ते जनतेवर अन्याय करत आहेत, कायदा-सुव्यवस्थेची पार दुरावस्था झाली आहे असं केशूभाईंचं म्हणाले. स्त्रिया आणि मुलं मोदींच्या राज्यात असुरक्षित असल्याचं केशूभाईंनी सांगितलं. मात्र राज्य सरकारला जनतेची फिकीर नाही. मोदी यांचं सरकार संवेदनाहीन असल्याचा आरोपही केशूभाईंनी केला.
 
राज्यामध्ये मुलं गायब होत आहेत. जी मुलं मोदींना भेटायला जातात, त्यांना अटक केलं जातं आणि दहशतवादी असल्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली जाते. शाळेत मिळणारं दुपारचं जेवणही २२५ ग्रॅमचं कमी होऊन १५० ग्रॅमच दिलं जात आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने काहीच विकास केला नाही. त्यामुळे आपण आता भाजपा सोडून स्वतःचा वेगळा पक्ष काडणार असल्याचे संकेतही केशूभाईंनी दिले.
 
 

First Published: Thursday, July 19, 2012, 17:31


comments powered by Disqus