सरकारला समजणाऱ्या भाषेत उत्तर देणार - अण्णा - Marathi News 24taas.com

सरकारला समजणाऱ्या भाषेत उत्तर देणार - अण्णा

झी २४ तास वेब टीम, राळेगण सिद्धी
गेल्या एका वर्षापासून आंदोलन सुरू आहे. आपल्या  आंदोलनाला सरकार दाद देत नाही.  सरकारला समजेल त्याच  भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुंबईतील  आंदोलनानंतर आता दिल्ली सोनिया गांधी आणि राहुल गांधी  यांच्या घरासमोर करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे यांनी आज येथे  सांगितले.
 
अण्णा हजारेंनी ग्रामसभेत राळेगणच्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करत होते. आंदोलनादरम्यान हिंसाचाराचे गालबोट नको, असे आवाहनही अण्णांनी कार्यकर्त्यांना केले.  मुंबईनंतर दिल्लीत उपोषण करणार असल्याचं सांगितलं. दिल्लीत सोनिया गांधींच्या घरासमोर उपोषणाला बसणार असल्याचंही अण्णांनी सांगितलं.  तसंच उद्या दुपारी चार वाजता आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधी घेऊन मुंबईला जाणार प्रयाण करणार आहोत असंही ते म्हणाले.
मुंबईतील मैदान मोठे आणि पैसेही...
मुंबईतील मैदान मोठं आहे आणि त्याचे भाडेही मोठं म्हणजे दिवसाला दोन लाख रुपये इतकं आहे असं अण्णा मिश्किलपणे म्हणाले. या मैदानाचे भाडं परवडणारं नव्हतं पण देणगी देणारे पुढे आल्याने ते भाड्याने घेणं शक्य झालं.
 

First Published: Sunday, December 25, 2011, 21:43


comments powered by Disqus