Last Updated: Tuesday, December 27, 2011, 17:45
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली लोकपाल विधेयकावर लोकसभेत गरमागर चर्चा सुरू झाली आहे. सरकारी लोकपालाबाबत विऱोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तर सरकारच्या वतीने नारायण सामी हे भूमिका मांडत आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या, लोकपाल विधेयकात अनेक त्रुटी असून, केंद्र सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. सराकारी विधेयक घटनेला धरून नाही. हे विधेयक संसदेचं अवमान करणारे आहे. विधेयक संघराज्य प्रणालीला धरून नाही. सरकारने विधेयकावरील संभ्रम दूर करावा. लोकपाल ही नोकरी नाही, त्यामुळे आरक्षण नको. लोकायुक्त नेमण्याचा अधिकार राज्यांना हवा.
विरोधकांनी ५७ दुरूस्त्या सुचविल्या आहेत. या दुरूस्त्यांचा आकडा १०० वर जाणार आहे. मात्र, सरकारकडून लोकपाल बिलात दुरुस्ती करण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र व्हिसल ब्लोअर आणि न्यायालयीन उत्तरदायित्व बिलावर सरकारकडून विचार होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
रोखण्यासाठी लोकपाल विधेयक सक्षम आहे. लोकपालला चौकशीचाही अधिकार असून, लोकपालची नेमणूक निष्पक्ष पद्धतीने होईल. अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करूनच, हे विधेयक तयार करण्यात आले आहे. शिवाय, लोकापालला प्राथमिक तपासाचा अधिकार आहे, असे सरकारच्यावतीने सामी यांनी बाजू मांडली.
मुंबईत अण्णांना सर्वच स्थरातून पाठिंबा दरम्यान, लोकपाल विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना, सक्षम जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांचे मुंबईत उपोषण सुरू केले आहे. अण्णांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा लाभतोय.
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युवकांबरोबरच ज्येष्ठ नागरीकही मागे नाहीत. MMRDA मैदानावरील आंदोलनात सहभागी होऊन अण्णांना समर्थन देण्यासाठी काही माजी सैनिकही आलेत.
लोकपाल विधेयक पास कऱण्यासाठी तेही अण्णांसोबत उपोषण कऱणारेत. 1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत लढलेले मधुकर चव्हाण यांनीही जनलोकपाल सरकारने मंजूर करावे, अशी मागणी केली आहे.
First Published: Tuesday, December 27, 2011, 17:45