Last Updated: Friday, January 27, 2012, 14:40
www.24taas.com ,कोलकता कोलकतातील एएमआरआय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगप्रकरणी रुग्णालयाच्या दोघा डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली. या रुग्णालयात ९ डिसेंबर २०११ रोजी आग लागून ९० जणांचा मृत्यू झाला होता.
एएमआरआय रुग्णालयाच्या संचालक मंडळाचे माजी सदस्य डॉ. मनी चैत्री आणि डॉ. प्रणव दासगुप्ता यांना आज पोलिसांनी अटक केली. पोलीस मुख्यालयात चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात ४ कर्मचारी आणि ९ संचालक मंडळाचे सदस्य आहेत.
अटकेतील एएमआरआय रुग्णालयाच्या संचालकांना सोडण्याची मागणी फिक्कीने पश्चिम बंगाल सरकारकडे केली होती. ही मागणी फेटाळून लावत कायद्याप्रमाणे दोषींवर कारवाई केली जाईल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हटले आहे.
First Published: Friday, January 27, 2012, 14:40