Last Updated: Tuesday, November 8, 2011, 12:23
झी २४ तास वेब टीम, हरीद्वारहरिद्वारमध्ये गायत्री परिवाराच्या एका कार्य़क्रमात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ३० पेक्षा जास्त भाविक गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर १६भाविक ठार झाल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही तुरळक भांडणानंतर अचानक धावपळ उडाल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे. हरिद्वारच्या हर की पौडी घाटावर ही दुर्घटना घडली आहे. यावेळेस सुरु असलेल्या होम होवनाच्या धुराने काही लोक बेशुद्ध झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.
आचार्य श्रीराम शर्मा यांना गायत्री परीवाराचे संस्थापक मानलं जातं. देशभरात या संस्थेचे कोट्यावधी भक्त आहेत. हर की पौडी इथे ६ ते १० नोव्हेंबर हा होम हवन होणार होता. यासाठी जगभरातून कोट्यावधी भाविक या ठिकाणी येणार आहेत.
First Published: Tuesday, November 8, 2011, 12:23